<
जळगाव – मूळ नांद्रा बुद्रुक येथील रहिवाशी आणि बीएसएफमधील सेवानिवृत्त जवान गौरव सोनवणे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले . त्यानिमित्त त्यांचे आज २ रोजी जळगावच्या रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात येऊन मिरवणूक काढण्यात आली . १९९८ मध्ये गौरव सोनवणे हे बीएसएफमध्ये सेवेत दाखल झाले होते . त्यांनी जम्मू काश्मीर,पंजाब,पश्चिम बंगाल,ओडिसा आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे . आज गौरव सोनवणे यांचे रेल्वेस्थानकावर आगमन झाले . त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले . यानंतर सजविलेल्या चारचाकी वाहनातून गौरव सोनवणे यांची मिरवणूक काढण्यात आली . यानंतर ठिकठिकाणी गौरव सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. वाल्मिक नगरातील महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी जवान गौरव सोनवणेयांचा सत्कार केला . यावेळी महिलांनी ठिकठिकाणी गौरव सोनवणे यांचे स्वागत करून औक्षण केले . आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांच्या सहकार्याने हि मिरवणूक रेल्वेस्थानक ,नेहरू चौक,टॉवर चौक,घाणेकर चौक मार्गे काढण्यात येऊन वाल्मिक नगर येथे समारोप करण्यात आला. नगरसेविका भारतीताई सोनवणे , राहुल पाटील,गुलाबराव बाविस्कर, योगेश बाविस्कर,, रमाकांत सोनवणे , मुकेश कोळी,अरुण इंगळे,अनिल सैंदाणे,पंकज सपकाळे, आशाताई सपकाळे, कमलाबाई कोळी, वत्सलाबाई सोनवणे, आदी उपस्थित होते .