<
कासोदा ता. एरंडोल ( सागर शेलार ) येथील लिटिल व्हॅली स्कूलमध्ये घरी बसल्या दिले जाताय शिक्षणाचे धडे .
सविस्तर असे कि , सध्या जगभरात कोरोना कोविड १९ या विषाणूने थैमान घातले आहे. म्हणून केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लॉकडाऊन सुरू केल्याने सर्व शाळा , महाविद्यालय , विद्यापीठ सर्व बंद असल्याने सर्वच शैक्षणीक माध्यम ओस पडले आहे. परीक्षेच्या कालावधीत लॉक डाऊन झाल्याने मुलांच्या अभ्यासावर व परीक्षांवर परिणाम होऊ नये म्हणून , कासोदा येथील लिटिल व्हॅली स्कूलचे चेअरमन अशोक पाटील सर यांनी व्हाट्सएप गृप व लीड अँपच्या माध्यमांच्या संपर्कातुन विध्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षेचा सराव पूर्ण करून घेत आहेत.
दि.१६ मार्च रोजी पासून शाळा आता पर्यंत बंद असून देखील शिक्षक दृक्श्राव्या च्या माध्यमातून विध्यार्थ्यांना अध्यापन व त्यांच्या शैक्षणीक शंकाचे निरसन करत आहे. तर शिक्षक दरोरोज विध्यार्थ्यांना घरचा अभ्यास ( गृहपाठ ) देत आहेत. लीड अँपच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.विद्यार्थी घरी बसूनच आनंदाने अध्ययन करीत असून , व सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक कोरोना विषयी पालकांमध्ये व विध्यार्थ्यांनमध्ये जनजागृती करीत आहे.
या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन अशोक पाटील सर , मुख्याध्यापिका सारिका कासार , माधुरी चौधरी , ललित पाटील शाळेचे शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.