<
विरोदा( किरण पाटील)- कोरोनाच्या संकटापुढे संपूर्ण जगासह देशही हतबल झाला आहे. कोरोनाच्या संकटाला मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांनी पाटील कुटुंबीयांतर्फे ३१ हजार रुपयांची देणगी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून ३१ हजारांचा धनादेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.