<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील एल. एल. बी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कोरोना बाबत दिला आगळावेगळा संदेश.
जगभरासह महाराष्ट्रात थैमान माजवलेल्या कोरोना विषाणूला पराभुत करण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी आगळी वेगळी शक्कल लढवून एक सेल्फ फोटो सह वेगवेगळ्या शब्दात संदेश तयार करुन समाजात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांनी संदेे तयार केला त्यांची नावे पुढिलप्रमाणेे आहत-१)विनोद सोनवणे २) प्रिया शिंपी ३) अरुण चव्हाण ४) कविता शिरसाठ ५) भुषन महाजन ६) तेजस्विनी पाटील ७) राजेश शिंदे ८) डिंपल खारवाल ९) प्रदीप देशमुख १०) प्रेरेणा मोनदोरे ११) सनद शिंदे १२) शुभांगी परदेशी १३) बालकृष्ण सोनवणे १४) कल्पना शिंदे १५) शुभम महाजन १६) डिंपल पटेल
कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होतो. यामुळे आमचे सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घरी राहावे,व सुरक्षित राहावे. असा संदेश देण्यात आला आहे. विद्यार्थी घरी राहुन देखील अशा प्रकारे सामाजिक माध्यमातून समाजात जनजागृती करत असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी युवाकुमार रेड्डी यांच्यासह प्राध्यापक वर्गातून कौतुकाची थाप देखील मिळत आहे.