<
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच मोठया उत्साहात साजरी करा.
भडगांव-(प्रमोद सोनवणे) – येथील पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांचे पदाधिकारी सह जनतेला आवाहन सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशाने विविध उपाययोजना केल्या आहेत.त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे आपला संपूर्ण भारत देश हा लॉकडाऊन केला आहे.यामुळे ह्या कोरोना विषाणू संसर्गजन्य जी साखळी आहे ती तुटण्याला मदत होते. म्हणून केंद्रसरकार,राज्यसरकार ने सर्व सामाजिक, धार्मिक सण, उत्सव, यात्रा, मेळावे इत्यादी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून सोशल डिस्टन्सिंग करण्याचे ठरविले आहे. म्हणून जेव्हा,जेव्हा या देशावर संकट आली आहेत तेंव्हा तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या संकट समयी मदत करून या देशाला प्रथम प्राधान्य देत मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत:भारतीय आहे.एवढे या देशाबद्दल प्रेम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होते. आणि त्यांचीच जयंती यावर्षी 14 एप्रिल या संकट परिस्थितीत आज आहे. म्हणून आज रोजी जे देशावर मोठे संकट आहे प्रथमतःआपण आपल्या देशावर आलेले संकट घालवूया,मग भिमजयंती मोठया उत्साहात साजरी करूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आबेंडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी यांची बैठक आज दि.१२ रोजी भडगांव पो. स्टे. ला पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदशनाखाली सोशल डिस्टन्सिंग ठेऊन पार पडली यावेळी पोलिस निरिक्षक धनंजय येेरुळे यांनी सांगितले की आगामी क़ाळात १४/०४/२०२० ते ३०/०४/२०२० रोजी चे दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी डॉ.आंबेडकर जयंती उत्सव सार्वजनिक न करता आप आपल्या घरातच साजरा करावा,मिरवणुक काढण्यात येवु नये असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांना या वेळी सांगितले.
यावेळी पदाधिकारी सुरेंद्र मोरे, एस.डी. खेडकर, विक्रम सोनवणे, आण्णा मोरे ,सिद्धार्थ सोनवणे, देवाजी अहिरे, गुरुदास भालेराव, उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी नी या वेळी लेखी निवेदन देत सांगितले देशात कोरोना सारख्या महामारीचे सकंट उभे आहे या वेळी डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती आम्ही घरातच बसुन साजरी करू व खेडो पाडयातील जनतेला ही आम्ही आवाहन करतो की आपण जयंती घरातच बसुन साजरी करुया असे या बैठकित आवाहन करण्यात आले.