<
अन्न हे पूर्ण ब्रह्म
जळगांव शहरातील सर्व समाजबांधवांना रेडक्रॉस भावनिक आवाहन करीत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाँकडाऊनच्या काळात आपल्या शेजारी अथवा परीचयातील ज्या समाजबांधवांचा उदरनिर्वाह हातमजुरीवर चालतो, जे खरोखरच हातावर पोट भरतात, प्रशासनाबरोबर समन्वय साधुन रेडक्रॉस व ओसवाल सुख शांती संघ यांनी संयुक्त विद्यमाने जेवण बनवणे आणि गरजूंन पर्यत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. बऱ्याच गोर गरीब मजूरांच्या दोन वेळ जेवणाची अडचण या निर्णयामुळे संपुष्टात येईल.
अन्न हे पूर्ण ब्रह्म या कार्यांच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी यथाशक्ती मदत द्यावी. या कार्यासाठी ज्याही दात्याला मदत करावयाची असेल त्यांनी रेडक्रॉस रक्तपेढीत किंवा रेडक्रॉस च्या बँक खात्यात जमा करू शकतात.
आपात्कालीन परीस्थीतीत मदत करणारे अनेक हात समाजात आहेत. त्यांची गुंफण व्यवस्थित झाल्यास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न यशस्वी होईल असा विश्वास वाटतो. असे भावनिक आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित रक्तपेढी जळगाव शाखेेच्या वतीने तेथील पदााधिकारी यांनी केले आहे.
मदत देण्यासाठी संपर्क
सुभाष सांखला, चेअरमन,
आपत्ती व्यवस्थापन, रेडक्राॅस,जळगांव
9422275431
गनी मेमन, उपाध्यक्ष,
इंडियन रेडक्राॅस सोसायटी, जळगांव
9823157786
विनोद बियाणी, मानद सचिव,
इंडियन रेडक्राॅस सोसायटी, जळगांव
9823020288
डॉ प्रसन्नकुमार रेदासनी चेअरमन
रक्तपेढी- रेडक्रॉस सोसायटी,जळगांव
9422275108
राजेश यावलकर- सहसचिव,
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगांव
9422775011
सुरेंद्र लुंकड, अध्यक्ष-
ओसवाल सुख शांती संघ, जळगांव
9823098663