<
जळगाव : येथील आकाशवाणी चौक परिसरातील लाडवंजारी मंगल कार्यालय येथे दररोज १ हजार ५०० लोकांचे जेवण दिले जात आहे. यासाठी अग्रवाल समाज आणि श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे देखील धान्य व इतर साहित्याचे सहकार्य करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
लाडवंजारी मंगल कार्यालय येथे शासनातर्फे स्थलांतरीत व गरजू लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे दररोज जेवणाची व्यवस्था केली जात आहे. शहरातील श्री अग्रवाल नवयुवक मंडळाने नुकतेच उजाड कुसुंबा येथे २०० कुटुंबाना किराणा वाटप करून लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. त्यानंतर देखील तूर डाळ, तांदूळ, आटा, बेसन, तेल, कांदा, बटाटा, आले, लसून या वस्तू नुकत्याच लाडवंजारी मंगल कार्यालयात अध्यक्ष मनिष अग्रवाल यांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत. प्रसंगी महसूल मंडळ अधिकारी बाळासाहेब ननवरे, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, लोकेश मराठे, सुनील माळी, जितेंद्र बागरे उपस्थित होते.
यावेळी राजेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, मनीष रामकुमार अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, रुपेश अग्रवाल, अमित अग्रवाल, हितेश अग्रवाल, महेश गदोडीया, अनिल अग्रवाल, सचिन अग्रवाल, राहुल अग्रवाल, सपन झुनझुनवाला, निलेश अग्रवाल, संजय अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, शंतनू अग्रवाल, अमृत अग्रवाल, यश अग्रवाल यांची उपस्थिती होती.