<
या देशातील शोषिक पीडित दलितांचे उद्धारक युगपुरुष क्रांतीसुर्य महामानवास कोटी कोटी प्रणाम.!
14 एप्रिल म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर सर्व जगात हे जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली जाते.14 एप्रिल या दिवसाला समानता दिवस तसेच ज्ञान दिवस अशा स्वरुपात साजरी केली जाते.याला कारण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समानता प्रस्थापित करण्यासाठी वेचले तसेच ज्ञानार्जनात व्यथित केले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या मानवाधिकार आंदोलनात,भारतीय संविधानाचे निर्माते तसेच प्रखर विद्वत्तेेसाठी ओळखले जातात.म्हणून त्यांना प्रज्ञासूर्य,क्रांतिसुर्य असेही म्हटले जाते.तसेच 14 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस त्यांच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्याप्रति असलेल्या आदरासाठी साजरा केला जातो.
संपूर्ण भारतात ही जयंती अतिशय हर्षोंल्हासात साजरी करण्यात येते.यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन मिरवणूक काढतात.त्यांचे जन्मस्थळ महु दीक्षाभूमी नागपूर तसेच चैत्यभूमी मुंबई अशा ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमतात तसेच विविध सरकारी कार्यालयात व सर्व बौद्ध समाज मंदिरात त्यांना विनम्र अभिवादन केले जाते व त्यांच्याप्रति आदर व सन्मान व्यक्त केला जातो.
पण मित्रांनो आजची 14 एप्रिल खुपच विशेष आहे.आज सर्व जगावर कोरोना नामक विषाणूचे संकट समोर उभे आहे आणि आपला देश पूर्णपणे लॉकडाउनच्या स्थितीत आहे.या परीस्थितीत आपण आपले संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या कलम व नियमांचे पालन योग्य पद्धतीने करू व हा जो लॉकडाउन आहे त्याला यशस्वी करून दाखवू व महामानवाला विनम्र अभिवादन घरातूनच करू मग घरातून कशा पद्धतीने अभिवादन करायचे आहे ? हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल..! तर समजून घ्या मित्रांनो 14 एप्रिल या दिवशी आपल्याला आपल्या घरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बाबासाहेबांच्या विचारांचे मंथन करायचे आहे. बाबासाहेबांवर आधारित पुस्तकांचे वाचन करून प्रत्येकाला पुस्तक वाचण्यास सांगावयाचे आहे.लहान मुलांना पुस्तके वाचण्यात घ्यावी नाहीतर त्यांना बाबासाहेबांचे छान असे चित्र काढण्यास सांगावे. बाबासाहेबांवर आधारित गीतांचे श्रवण करावे. बाबासाहेबांना अभिवादन करताना कुटुंबासोबत फोटो काढून आपल्या जवळीक असलेल्यांना पाठवावे 14 एप्रिल हा संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबासोबत हर्षोल्हासात साजरा करावा. कोणीही घराबाहेर पडून शासनाने लावलेल्या लॉकडाउनचे उल्लंघन होईल व त्याचा ठपका आपल्या बाबासाहेबांच्या जयंती वर लागेल असे न वागता.डॉ बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या कलमांचा आदर करून आपल्या देशहितासाठी एक नाविन्यपूर्ण जयंती साजरी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशहिताचे विनम्र अभिवादन करावे म्हणून माझ्या मित्रांनो मी तर माझी 14 एप्रिल घरात साजरी करून देशहित साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहे आणि तुम्ही?
मनोज भालेराव (शिक्षक)-प्रगती विद्यामंदिर,जळगाव मो.नं- ८४२१४६५५६१