<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – सध्या बिकट परिस्थिति नुसार संपुर्ण देशात महामारी कोरोना आजाराने थैमान घातले असून
या महामारी कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने संपुर्ण देशात जनता कर्फ्यु नंतर,21 दिवसांचा म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.
तरी या परिस्थितीत “कोरोना”चा प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे पुन्हा लॉक-डाउन 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे.
महामारी कोरोनामुळे जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून डॉक्टर, पोलीस प्रशासन, जीवाचे रान करीत आहेत.
त्याचप्रमाणे पत्रकार देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असून यांच्या सुरक्षेचा विचार करत जामनेर येथील असंख्य सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षां कडून, सुरक्षा किट चे वाटप करण्यात येतआहे.
जामनेर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट,चे प्रमुख-श्यामचैतन्यजी महाराज यांनी आपल्या आश्रमात तयार केलेले मास्क वाटप करण्याचा निर्णय आज सकाळी नगरपालिका चौकात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस प्रशासन,आर.पी.एफ.जवानांना महाराजांच्या हस्ते मास्क चे वितरण करण्यात आले.
यावेळी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक-प्रताप इंगळे,सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार- अभिमान झाल्टे ,सुनिल इंगळे,गजानन तायडे, अनिल शिरसाठ, साहेबराव साळुंके,भानुदास चव्हाण, नरेंद्र इंगळे, मिलिंद लोखंडे, राहुल इंगळे, प्रल्हाद सोनवणे, ईश्वर चौधरी, बाळू वाघ,किरण चौधरी,दादाराव वाघ, विलास ढाकरे, सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.