<
जळगांव(प्रतिनिधी)- आज जळगांव लोकसभा खासदार उन्मेष पाटील यांनी शासकीय निवासी कॅम्प लाड वंजारी समाज मंगल कार्यालय येथे सायंकाळी ७ चे सुमारास भेट दिली. सर्व निर्वासित नागरिक यांचे त्यांनी आसथेवाईकपणे चौकशी केली. सदर कॅम्प साठी नाथ फाऊंडेशन जळगांव, शिव सहयाद्री प्रतिष्ठान नशिराबाद अध्यक्ष गणेश चव्हाण, संत हरदासराम सेवा मंडळ जळगांव यांचे नियोजपूर्वक कामकाज सुरू असून त्यांना अनमोल सहकार्यहितेश प्लास्टिक कंपनी, राजा पाहुजा, लखनजी बुधानी, आर सी बाफना ट्रस्ट, जैन इरिगेशन कंपनी जळगांव, सुनील झवर, चंदन कोल्हे, भालचंद्र चौधरी, क्रेडाई असोसिअशन जळगांव तर्फे निर्णय चौधरी, पुष्कर नेहते तसेच सागर चौधरी (परिवर्तन न्यूज चॅनल), यांचे सहकारी पूर्णवेळ सहकार्य करत आहे. तसेच सदर ठिकाणी महसूल प्रशासन मंडळ अधिकारी/तलाठी वर्ग नियोजित शासकीय निवासी कॅम्प येथे तळ ठोकून आहेत.