<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार कासोद्यात विनाकारण फिरणाऱ्या लहान मोठ्या वाहनांवर सुमारे १८ मोटर सायकलिंवर मोटार वाहन प्रतिबंध अधिनियम कलम २०७ प्रमाणे कासोदा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात विना परवाना धारक , विना लायसन्स धारक , विनाकारण जमावबंदीत मोटरसायकल घेऊन फिरणाऱ्या वर कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. रविंद्र जाधव यांच्या सोबत पी.एस.आय.नरेश ठाकरे , पो.कॉ.जितेश पाटील , पो.कॉ. समाधान भागवत , पो.कॉ. नितीन पाटील , मुन्ना पाटील , यांच्या टीमने दि. १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान महेश मंदिरासमोर झालेल्या कार्यवाही मुळे विनाकारण गावात फिरणाऱ्यांना चांगलाच चोप बसला आहे. कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यवाही मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.सर्वांनी घरात रहावे विनाकारण घराबाहेर पडू नये शासन व प्रशासनास सहकार्य करण्याचे
आव्हान स.पो.नि.रविंद्र जाधव यांनी ग्रामस्थानां केले आहे.