<
बाबासाहेबांची थोरवी, वर्णावी काय ?
संविधानान दिला त्यांनी सर्वांना न्याय
कोणावरती होऊ दिला नाही अन्याय
यावरी, अजून आपणास हवे तरी काय ? ||1||
डॉ. बाबासाहेबांनी सर्वांसाठीच केला कायदा,
या कायद्याचा सर्वांना झाला फायदा,
सर्वांसाठी समता, बंधुभाव सर्वांनाच समानता,
यासाठीच बाबासाहेबांचे गुण गाते जनता. ||2||
चला तर संविधानाचा फायदा करुण घेऊ
स्त्री-पुरुष, जात-पात विसरुन सर्वच पुढे जाऊ
माणूस म्हणून, माणुसकी, हाच धर्म सर्वांमध्ये रुजवू
शिक्षक घेऊन, ज्ञानी होऊन सगळेच सन्मानाने जगू ||3||
ज्ञानाचा उपयोग स्वतःबरोबरच इतरांसाठीही करु
स्वतःबरोबरच सबंध मानव जातीचे हित साधू
डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त हिच शपथ घेऊ
सक्तीच्या शिक्षणाचा हक, वाड्या, वस्त्यापर्यंत पोहोचवू ||4||
ज्ञानगंगा, घराघरात, दारादारात, पोहोचवू
नुसतीच जयंती, पुण्यतिथी साजरी न करता
बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारु
भारत देशाचे नाव, जगाच्या पाठीवर उंचवू
129व्या जयंती निमित्त,त्यांच्या प्रतिमेस हिच मानवंदना.||5ll