<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सुजय महाजन प्राथमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी येथे दि.१६ मार्च पासून लॉक डाऊन असल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी शाळा व शिक्षकांनी सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांना होम वर्क देत अभ्यास करून घेतला जात आहे. शाळेकडून पालकांचा वर्गवारी ग्रुप तयार करण्यात आला आहे, त्यात दररोज होम वर्क दिला जातो आहे. प्रत्येक वर्गशिक्षक पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासविषयी चर्चा करत आहेत, तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम दिले जात आहे. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द , म्हणी, गणिती कोडे, इंग्रजी स्पेलिंग, प्रत्येक विषयाचा घटक निहाय चाचण्या तसेच अभ्यासाच्या युट्युब लिंक पाठवल्या जात आहे. तसेच प्रत्येक शिक्षक पालकांशी संवाद साधून आपल्या पाल्याना कोरोना विषयी काळजी घेण्यास सांगत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्यध्यापिका, शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.