<
जळगांव(प्रतिनिधी)- उपक्रमशील शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक यांच्या जिल्हानिहाय निवड यादी राज्य समन्वयक राष्ट्रीय आदर्श शिक्षक बाळासाहेब वाघ, राज्य समन्वयक आदर्श शिक्षक सिद्धाराम माशाळे, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप गुंड, राजकिरण चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील तसेच राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर पाटील कुंझरकर यांच्या भरीव व सातत्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी निवड जाहीर केली आहे. त्यांचे जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात, स्वतःच्या दोन्ही मुलांना कार्यरत जिल्हा परिषद शाळेतच दाखल करणे, बेटी बचाव बेटी पढाव, कृती संशोधन तसेच विविध सण उत्सवात शासकीय योजनांची जनजागृती, राज्यशासन टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंग्रजी विषयाच्या तेजस प्रकल्प अंतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून तसेच विविध शैक्षणिक सामाजिक साहित्य संस्था संघटना महत्त्वपूर्ण यशस्वी जबाबदारी पार पाडीत असून त्यांचे नेहमीच सकारात्मक वागणे व मोठे कार्य असून अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तालुका स्तर प्रशिक्षण यांत तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते जबाबदारी पार पाडत असल्याने त्यांच्या भरीवकामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.