<
जामनेर-(अभिमान झाल्टे) -देशात कोरोना महामारीमुळे ३ में पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब यांनी शहरी भागात जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने ११ ते ५ असे वेळपरिपत्रक काढले आहे.
परंतु ग्रामीण भागात दुध केंद्र, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ग्राहक वेळेचे भान न ठेवता आपली खरेदी/ विक्री सकाळ व संध्याकाळच्या आय केव्हापण करीत आहे.
जामनेर तालुका तहसीलदार शेवाळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काल दिलेले आदेश हे महानगर पालिका, नगरपालिका व नगरपंचायत याभागात लागू केले आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने घाबरून न जाता संचार बंदी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन न करता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर गर्दी करू नये असे आवाहन देखील तहसीलदार शेवाळे यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दुकान हे जामनेर व शेंदुर्णी वगळता ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण भागात रोजच्या नियमित वेळेत दिवस भर सुरू राहणार असून ग्राहकांनी गर्दी न करता सोशल डीस्टेन्सिंग चा वापर करावे व पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे.
विनाकारण घराबाहेर कोनीही पळु नये जमावबंदी आदेश मोडण्याचा प्रयत्न केल्यास १४४ व १८८ कलम नुसार गुन्हा नोंदविण्यात येईल.