जळगाव – (प्रतिनिधी) येथील अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, कला वाणिज्य व गृह विज्ञान महिला विद्यालयाचे प्राचार्य माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ या कायद्याचा ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे समजते.सविस्तर असे की जळगाव येथील माहिती अधिकार प्रशिक्षक दिपक सपकाळे यांचे प्रतिनिधी यांना सदर महाविद्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज घेऊन पाठवले असता, तेथील प्राचार्य यांनी अर्जावर पत्ता चुकीचा दिला, या कारणाने अर्ज नाकारला. प्रतिनिधीने विचारले असता, योग्य पत्ता सांगावा, तर प्राचार्यांनी सांगितले की, बाहेर लिहिलेला आहे, बघून घ्यावा, त्यामुळे प्रतिनिधी यांनी सुधारित अर्ज करून पुन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे अर्ज दाखल करण्याकरिता गेले असता, टाळाटाळ करून माहितीचा अधिकार अर्ज स्वीकारलेला नाही. त्यामुळे या महाविद्यालयातील प्राचार्य यांना माहितीच्या अधिकाराचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे लक्षात येते.माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा कायदा निर्गमित होऊन 14 ते 15 वर्षे झाली एवढा प्रदीर्घ कालावधी उलटून देखील महाविद्यालयातील प्राचार्यांना या कायद्याविषयी ज्ञान असू नये ही खूप मोठी शोकांतिका आहे. माहितीच्या अधिकारात, माहिती अधिकार अर्ज न स्वीकारण्याचे नेमके कारण काय ? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे .