<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – बहुतांशी लोकांना आता रिकामा वेळेत काय करावे हा प्रश्न पडला आहे .
मात्र या वेळेचा सदुपयोग करता शक्य असून या वेळेत ज्ञान प्राप्त करण्याची ही चांगली संधी असून या काळात गीता, रामायण ,ज्ञानेश्वरी ,अशा जीवन जगण्याची शिकवण देणाऱ्या ग्रंथांचे व इतर चांगल्या पुस्तकांचे वाचन करून आपण आपला वेळ सत्कारणी लावावा असे आवाहन ह भ प अनिल महाराज यांनी केले कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉक डाऊन सुरू असून याबाबत बोलताना अनिल महाराज यांनी सांगितले की कोरोणाची महामारी आपल्या वेशीपर्यंत आली आहे ,
आणि याला अटकाव घालण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून अविरतपणे आपली वैद्यकीय यंत्रणा काम करीत आहे आणि एक नागरिक म्हणून त्यांना सहकार्य करने व शासनाला मदत करणार आपलं आद्य कर्तव्य आहे जोपर्यंत सरकार व प्रशासनाकडून सूचना येत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या घराबाहेर न पडता घरात बसूनच या लढाईत उतरायचे आहे सध्या अनेकजण घरात बसून वेळ जात नाही या कारणाने विनाकारण घराबाहेर पडून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहे त्याऐवजी आपल्या घरात बसून भगवंताचे नामस्मरण करून गीता, गाथा ,ज्ञानेश्वरी, शिव ग्रंथ ,व दुसरी अजून चांगली वीर महापुरुषांची आत्मचरित्र इत्यादी पुस्तक वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाकावी असे आवाहन त्यांनी केले मनापासून श्रद्धा ठेवून कोणत्याही ठिकाणाहून केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो त्यासाठी गर्दी करून मंदिरात जाण्याची गरज नाही असेही महाराज यांनी सांगितले.