<
जळगाव : येथील लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शहरात व गरजू लोकांसाठी मदतकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यत किराणा कीट वाटप, भोजन वाटप त्यासह सेनीटायझर रूमदेखील त्यांनी तयार करून दिल्या आहेत.
सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. या काळात संचारबंदी लागू झाल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल तर्फे शहरातील विविध ठिकाणी त्यांनी सलग १७ दिवस सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळेला गरजू व गरिबांना भोजन दिले आहेत. तसेच कोरोना आजारापासून काळजी घेण्यासाठी २ हजार पेक्षा अधिक मास्क व सेनीटायझर वाटप केले असून शहरासह तालुक्याच्या विविध भागात त्यांनी किराणा कीट वाटप केलेले आहेत. याचा लाभ गरीब, मजूर, श्रमिक तसेच लहान व्यावसायिकांना झाला आहे.
लायन्स क्लबच्या या उपक्रमात अध्यक्ष अनिल पगारिया, सचिव निलेश संघवी, विश्वस्त किशोर बेहरानी, आदेश ललवाणी, अशोक रुणवाल, सुजीत मुथा, सुगन मुणोत, प्रवीण पगारिया, पूनमचंद अग्रवाल, शिरीष सिसोदिया, दिनेश बोरा आदी परिश्रम घेत आहेत.