<
जळगाव-(प्रतिनिधी)- येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना बाबत नागरिकांच्या जनजागृती साठी एक नवा व्हिडिओ तयार करुन नागरिकांना एक आगळावेगळा संदेश दिला. जगभरासह महाराष्ट्रात थैमान माजवलेल्या कोरोना विषाणूला पराभुत करण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी आगळी वेगळी शक्कल लढवून जनजागृती पर एक व्हिडीओ तयार केला. कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होतो. यामुळे आमचे सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घरी राहावे,व सुरक्षित राहावे. असा संदेश या व्हिडिओ द्वारे देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य रेड्डी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाँ. रेखा पी. पहुजा यांच्यासह प्राध्यापक वर्गातून कौतुकाची थाप देखील मिळत आहे. सारिका कुमावत, राजनंदिनी धनके, कल्याणी चौधरी, समृद्धी देशपांडे, पल्लवी माळी, प्रियंका साळवे, रोहन सावंत, अनिल संगनगिरे, दिपक दुबे, हर्षा तायडे, डिम्पल बऱ्हाटे, ध्रुवेश मराठे, भूषण मराठे, प्रतिमा सनेर, कोमल मोहता, शेहबाज खाटीक आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.