<
भरारी फाउंडेशन आणि वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीचा संयुक्त उपक्रम
जळगाव ; – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांना काहीतरी मदत व्हावी , हि सामाजिक बांधिलकी म्हणून भरारी फाउंडेशन आणि वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आज १७ रोजी सकाळी गरजुंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले .या किराणा साहित्यामध्ये गहूचे पीठ,तांदूळ,डाळ , बेसन , तेल आदी जीवनावश्य्क वस्तूंचा समावेश होता . यावेळी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष अद्वैत दंडवते , भरारीचे गोपाळ कापडणे , माजी उप सरपंच शेनफडू पाटील, भगवान सोनार,बापू मराठे, अकील मेंबर,नाना हवलदार,प्रकाश मराठे, चंदू काळे,संजय सुर्यवंशी,सुनिल माळी,आबा सोनार आदी उपस्थित होते.