<
जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) दि.६ एप्रिल रोजी कोविड १९, कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या अंतर्गत वाषिक उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान केलेले निवेदन मा.राज्यपालं, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सर्व सार्वजनिक विद्यापीठे यांना ई-मेल द्वारे दिलेले आहेत.
त्यानुसार जळगाव विद्यापीठालाही सूचना व पर्याय प्राप्त झालेले आहेत परंतु त्यावर कोणताही विचार विनिमय न करता विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांना सूचना करताना त्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात दि.१५ एप्रिल २०२० रोजी सकाळ या दैनिक वृत्तपत्रामध्ये विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी आपली कोविड १९ कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या धर्तीवर अधिकृत भुमिका मांडताना विद्यापीठ आणि अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालय व स्वायत्ता महाविद्यालय मध्ये आँनलाईन परीक्षा घेण्यात येतील अशी सूचना दिल्या होत्या व यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज आहे असेही सांगण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नियुक्त विद्यापीठ कुलगुरु समितीने शासनाला कोणताही रिपोर्ट सादर केलेला नाही किंवा युजीसीच्या समितीने सुद्धा कोणताही निर्णय दिला नाही तसेच बऱ्याच महाविद्यालयात अजूनही अभ्यासक्रम अपूर्ण आहे अश्या अवस्थेमधे जळगाव विद्यापीठाने अशी कोणती तयारी केली आहे असा आंम्हाला प्रश्न पडला आहे याच पार्श्वभुमिवर आमच्या महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी मार्फत आँनलाईन परीक्षेसंदर्भात आज ई-मेल द्वारे जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले व त्यात आम्ही काही प्रश्न विचारले आहेत आता जर खरोखरच विद्यापीठाने तयारी केली असेल तर ते आमच्या निवेदनातून मांडलेलं प्रश्नाची उत्तरे देतील अन्यथा आम्हाला असे गृहीत धरता येईल कि विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी अजूनही गंभीर नाही असे परखड मत मासूचे संस्थापक अध्यक्ष ऍड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
नुसत्या परीक्षा महत्वाच्या नाहीत त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे मुल्यांकन, निकाल घोषित करणे व पुढील वर्षासाठी प्रवेश हे महत्वाचे आहे. त्यानुषंगाने परीक्षेची प्रक्रिया आणि पारदर्शकता जाणून घेण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आणि अधिकार आहे असं विद्यापीठ ला प्रश्न विचारले आहेत असे यावेळी मासु उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी सांगितले.