<
जळगांव( धर्मेश पालवे)-महाराष्ट्र सरकार च्या सबका साथ सबका विकास आणि सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अश्या आशयाखाली मानसिक दुर्बलता ,लोकांचा वाढता एकांगी पणा,कौटुंबिक कलहाच्या माध्यमातून स्त्री, पुरुष, अबाल,कानी वृद्ध याकरिता शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी मदतीच्या व पुनर्वसनासाठी च्या साठी महानगर पालिके कडून सेवाभावी संस्था आणि समाजसेवी कडून ,अथवा NGO कडून सेवा पुरवणेक करिता प्रस्ताव सण20018 रोजी मागवले होते.त्या प्रमाणे जळगांव जिल्ह्यातील आणि शहरातील बेघर निराश्रित आणि भिकारी लोकांच्या पुनर्वसणासाठी शासकीय अनुदानही मिळाले आहे,त्यात अश्या लोकांसाठी दोन वेळेचं जेवण,चहा नाश्ता, झोपण्यासाठी व्यवस्था, अंघोळ व तस्तम सुविधा, राहण्याची व्यवस्था, आणि वैद्यकीय सेवा व सुविधा, तसेच मानसिक आरोग्यासाठी व कलहातुन बाहेर येण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे अपेक्षित आहे।मात्र जळगांव जिल्ह्यात अजूनही या बाबतीत मनपाने अजूनही मनापासून लक्ष दिलेलं नाही अस चित्र आहे।भरपावसात सदर महिला आपलं नशीब घेऊन ओल्या कपड्यात सैरभैर फिरताना सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींस आढळली, तिला खायला बिस्कीट पुडा देऊन राहण्याची व्यवस्था, भिक मागणीचकारण आदी गोष्टी वर बोलत केलं. तिने सांगितलेलं एकूण या बाबत शोध सुरू केला.आणि मनपा ने अजूनही वर्षभरात भिकारी बेघर आणि निराश्रित लोकांच्या पुनर्वसनासाठी काहीही ठोस भूमिका घेतली नसून अनुदान घशाशी पाडून घेतलं आहे असं दिसून आलं.जिल्ह्यात अनेक भ्रष्टाचार उघड झाले आहे, मात्र सदर भ्रष्टाचार हा सर्व सामान्यांना डोळ्यात अंजन घालणारा आहे,हेच खरं.