जामनेर -(अभिमान झाल्टे) – तालुक्यातील दुर्गम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सावरला गावामध्ये तळेगाव येथील साई रत्न हॉस्पिटल चे डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी कोरोना याबाबत जनजागृती करून खोकला सर्दी असलेल्या लोकांचे तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार केले .
यावेळी सावरला सरपंच युवराज पाटील, विकास पाटील ग्रामसेवक एल.के पाटील , आनंद सपकाळ, राजेश लोढा, गजानन कोळी सर ,शांताराम जाधव,रोहित पाटील,उपसरपंच सुरेश कोळी, पो. पा.भागवत पाटील,नंदू भोई ,अरविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा आशा अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
यावेळी सुमारे सर्दी खोकला व ताप असलेल्या दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार मोफत करण्यात आले.