जळगाव– जिल्ह्यातील एक वृद्ध महिला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती . कोरोणा सदृश्य लक्ष नसलेले तिचे नमुने पाठविण्यात आले होते. त्या महिलेचा तपासणी अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला असून ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे . याला शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दुजोरा दिला आहे. संबंधित महिलेची विदेशवारी अथवा कुठलीही हिस्ट्री नसुन ती अमळनेरची असल्याचे समजते . पुढील माहिती उपचारादरम्यान चौकशीत समोर येणार आहे