तांदुळवाडी/भडगाव(प्रमोद सोनवणे)- येथील अनेक दिवसांपासून करोना विषाणू व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवापाड कष्ट घेत असून सुदैवाने अजून एकही रुग्ण आढळून आला नाही मात्र राज्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेची देखील जबाबदारी वाढत आहे. गावातील, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, नर्सेस व आरोग्य विभागाचा स्टाफ हा त्यांची माहिती गोळा करून याची दररोज प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणार आहेत. या सर्व आरोग्य सेवकांच्या आरोग्यासाठी सामाजिक भान जपत आपण देखील समाजाचे देणे लागतो या जाणिवेतून सुनिता समाधान पाटील FLCRP (आर्थिक साक्षरता सखी गटातील महिलांना आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून देणारे)यांनी स्वतः घरी मास्क बनवले व सर्व वस्तीतील लहान मुले, महिला यांना आपल्या मार्फत मोफत मास्क दिले. त्यांच्यासोबत स्वप्निल रविंद्र निकम यांनी कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजाराविषयी माहिती सांगितली व आपली काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. सोबत कोतवाल कविता सोनवणे व समाधान पाटील हे उपस्थित होते. तसेच यावेळी मठ वस्तीतील महिला, पुरुष लहान मुले-मुली आदी उपस्थित होते.