कोरोना आजारांवर प्रतिबंधात्मक साहित्य चौदाव्या वित्त आयोगातून वाटप
रत्नापिंप्री ता.पारोळा (प्रतिनिधी) जगभर कोरोना रोगाने थैमान घातले आहे भारतातही या रोगांच्या प्रवेश झाला असून शासन प्रशासन अनेक उपाययोजना आखत असून त्या अंबलबजावणी देखिल केलेल्या जात आहेत असेच रत्नापिंप्री गृप ग्राम पंचायतीने देखील शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून रत्नापिंप्री, होळपिंप्री ,दबापिंप्री या तिन्हीं गावांसाठी चौविस शे साबण( हात धुण्यासाठी) सॅनिटाझर च्या बाराशे बाटल्या ( हाताला लावण्यासाठी) तर कुटूंबातील प्रत्येक सदस्यांना एक एक असे पांच हजार मास्क रत्नापिंप्रीसह , दबापिंप्री , होळपिंप्री गावात वाटप करण्यात आले यावेळी सरपंच प्रमिलाबाई भिल, उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामसेवक दीपक भोसले,तिन्हीं गावातील आशा सेविका यमुनाबाई लांडगे, अनिता पाटील, रूपाली पाटील , ग्राम पंचायत सदस्य, सुरेश पाटील,किरण पारधी , ज्ञानेश्वर पाटील, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत,होळपिंप्रीचे पोलिस पाटील गौतम भालेराव, आरोग्य सेवक रविंद्र शिंपी, आरोग्य सेविका एस.एम.शेख, अंगणवाडी सेविका कल्पना पाटील रामचंद्र पाटील मयुर पाटील शरद पाटील किशोर वाघ आदींनी वाटपासाठी सहकार्य केले रत्नापिंप्री गृप ग्राम पंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून कोरोना रोगाच्या नियंत्रणासाठी मास्क , सॅनेटाझर, साबण आदी साहित्य तिन्हीं गावांसाठी घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले.