<
जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना समाजकार्य विभागाचे विद्यार्थी करता कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती लोकडाऊनच्या काळात जर डिपार्टमेंट सुटी आहे परंतु समाजकार्य विद्यार्थी आप-आपल्या गावात समाजकार्यची महत्त्वपुर्ण भूमिका बजावत आहे.
गावतील नागरिकांना कोरोना जनजागृती व ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका सोबत काम करून गावात सॅनिटीझर वाटप करणे, तसेच गावामध्ये लोकांना मास्क वापरणे, हात कसे धुवावे, सुरक्षित अंतर ठेवा, आय गॉट अँप, आरोग्य सेतू अँप, या सर्व गोष्टी गावकऱ्यांन पर्यंत पोचवण्याच काम करत आहे. जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात असणारे समाजकार्य राष्ट्रीय सेवा योजना स्वमसंवेक मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दिपक सोनवणे सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे.