<
जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे देण्यात येणारे सन २०२० चे “जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक व क्रीडा गौरव पुरस्कार” आज जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रदिप तळवेलकर व सचिव राजेश जाधव यांनी जाहिर केले प्रत्येक तालुक्यातून एक,जळगाव शहरातून एक व कनिष्ठ महाविद्यालय गटातून एक असे १७ जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व दोन जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे यासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते आलेल्या प्रस्तावाची छाननी जेष्ठ क्रीडाशिक्षक तथा मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी (ए टी झाम्बरे विद्यालय), जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार्थी प्रशांत जगताप (ला ना सार्वजनिक विद्यालय),राष्ट्रीय खेळाडू डॉ कांचन विसपुते (विवेकानंद प्रतिष्टान), आदर्श पर्यावरण शिक्षक किशोर पाटील (जिजामाता विद्यालय) आदर्श उपक्रमशील क्रीडाशिक्षका समिधा सोवनी (महाराणा प्रताप विद्यालय) यांच्या निवड समितीने करून पुरस्कार्थीची निवड केली. जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार्थी याप्रमाणे- जळगाव शहर (महाविद्यालयीन गट )- डॉ रणजित शामराव पाटील (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव). जितेंद्र किसन शिंदे (सेंट टेरेसा स्कुल,जळगाव) जळगाव तालुका-प्रशांत सुधाकर महाजन (माध्यमिक विद्यालय कुसुम्बा) भुसावळ तालुका- लक्ष्मीकांत वसंत नेमाडे (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव) यावल तालुका- किशोरकुमार उत्तमराव पाटील (शकुंतला महाजन विद्यालय फैजपूर) रावेर तालुका- अविनाश राजधर महाजन (वामनराव पाटील विद्यालय मस्कावद) मुक्ताईनगर तालुका- विजय मारोती लोंढे (जे ई स्कुल मुक्ताईनगर) बोदवड तालुका- राजेश श्रीराम अंजाळे (न ह रांका विद्यालय बोदवड) जामनेर तालुका- दिपक कृष्णा चौधरी (ना आ बोरसे विद्यालय शहापूर) पाचोरा तालुका- शेख सादिक शेख इमान (ग्रामविकास विद्यालय हरेश्वर पिंपळगाव) चाळीसगाव तालुका- अजय गोपाळराव देशमुख (राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव) पारोळा तालुका- संदिप हिरामण पवार (नागरिक शिक्षण मंडळाचे विद्यालय तामसवाडी) एरंडोल तालुका- प्रा मनोज नत्थु पाटील (डी एस पाटील विद्यालय एरंडोल) भडगाव तालुका- बाळू देवराम साळुंखे (गो पू पाटील विद्यालय कोळगाव) धरणगाव तालुका- सचिन लोटन सूर्यवंशी (सारजाई कुडे विद्यालय धरणगाव) चोपडा तालुका-देविदास हिरामण महाजन (झि तो महाजन विद्यालय धानोरा) अमळनेर तालुका- सुनिल प्रभाकर वाघ (जी एस हायस्कुल अमळनेर) जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक क्रीडा गौरव पुरस्कार्थी–गोविंदा झुलाल पाटील (आदर्श कन्या विद्यालय भडगाव) व प्रा हरिश मुरलीधर शेळके (स्व बबनबाऊ बाहेती कनिष्ठ महाविद्यालय जळगाव) सदर पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन पुढिल महिन्यात करण्यात येणार आहे असे जळगांव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी कळविले आहे.