<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कोरोना काळात गरोदर महिलांना कोरोनाच्या जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यात पोषण आहार व नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे व काय उपाय योजना केल्या पाहिजे. हे पटवून दिले. नेहरू युवा केंद्र जळगाव, यावल प्रतिनिधी स्वयंसेवक निखील मोरे यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी जिल्हा समन्वयक नरेन्द्र डांगर यांनी सर्व स्वयंसेवकांना आव्हान केले आहे.