<
जळगांव(चेतन निंबोळकर)- ओंजळी भरण्याअगोदर समाजाला देत चला या संत गाडगे बाबांच्या वाक्याला अनुसरून आज कृती फाऊंडेशनच्या वतीने गरजुंना महिना भराचा किराणा वाटप करण्यात येत आहे.
दरवर्षी या संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आज संपूर्ण जग कोरोना संसर्ग विषाणू समोर हतबल झाले असून देशात व राज्यात देखील त्याचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासकीय यंत्रणे समोर देखील दिवसेंदिवस मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात व राज्यात संचारबंदी व ३ मे पर्यंत लॉकडाऊन झाल्याने दररोज मोल मजुरी करणारे तसेच हातावर पोट भरणाऱ्या गरीब गरजू कुटुंबासाठी तसेच बांधकाम मजूर बांधवांसाठी शहरातील कृती फाउंडेशन ही संस्था पुढे आली असून शहराला लागून असलेल्या विविध ठिकाणी जाऊन गरजू कुटूंबियांना धान्य वाटप करत आहेत. देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला रोखण्यासाठी ही संस्था व त्यांचे पदाधिकारी कोरोना विषयाबाबत नागरिकांची जनजागृती करुन मार्गदर्शन करीत आहेत. कोणीही घराबाहेर जाऊ नका, या भयानक विषाणूला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करा, वेळोवेळी सरकारची मदत आपल्या पर्यंत पोहचेल परंतु आपले घर सोडून जाण्याची कोणतीही जोखीम करू नका, बाहेरून हा आजार आपल्या कुटूंबात आणून धोका निर्माण करू नका. असे फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, माधवबाग हाँस्पिटलचे डाँ. श्रद्धा माळी, डाँ. श्रेयस महाजन मार्गदर्शन करत असून सर्वांनी सावधगिरी बाळगून कोरोनाला पळवून लावण्यास मदत करा असे आवाहन करत आहेत. तसेच यापुर्वी कोरोना पार्श्वभूमीवर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुजित माळी व तुषार महाजन यांच्यावतीने चाळीसगांव तालुक्यातील शहर, ग्रामिण, RPF, GRP, महामार्ग पोलीस, या सर्व पोलिस बांधवाना मास्क, सँनिटायझर, नाष्टा, पाणी बाँटलचे वाटप करण्यात आले. ही संस्था गेली पाच वर्षांपासून अध्यक्ष प्रशांत महाजन व सचिव जी.टी. महाजन यांच्या मार्गदर्शनाने विविध ठिकाणी समाजोपयोगी जसे की राष्ट्रीय कार्य रक्तदान, आरोग्य शिबीर, निराधार गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्य, पर्यावरण व नागरिकांसाठी सामाजिक कार्य करत असून आज सारा देश, राज्य, भयानक अशा कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटात आहे त्या पार्श्वभूमीवर ही संस्था पुढे येऊन गरजूंना मदतीचा हात देत आहे. या उपक्रमाने गोरगरीब गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देखील मदत केली आहे. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन यांच्यासह कार्याध्यक्ष तसेच पो.बि.सं.विभागाचे अमित माळी, कार्यध्यक्ष तसेच माधवबाग हॉस्पिटल च्या संचालिका डॉ.श्रद्धा माळी, डॉ.श्रेयस महाजन, गोविंद खैरनार, दिपक पुजारी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.