<
भडगांव-(प्रमोद सोनवणे) – सध्या देशासह राज्यात कोरोना या अति संसर्गजन्य विषाणूचा पार्दू भाव वाटल्याने या विषाणू चा संसर्ग झालेले रुग्ण देशात ठिकठिकाणी आढळत आहे. कोरोना या विषाणूचा पार्दुभाव तथा संसर्ग रोखणे करीता जळगांव जिल्हयात मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगांव यांच्या आदेशा अन्वये दि. १४ एप्रिल ते दि.३मे पर्यंत जळगांव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगांव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध( सिमा बंदी)करण्यात आले आहे.
असे असतांना दि.२० एप्रिल रोजी गुढे पो.पा मिलिंद मोरे यांनी भडगांव पोलिस स्टेशनला ला लेखी अर्जाव्दारे नितिन भगवान मोरे वय-२८रा.भांडुप,सुनिल वसंत मोरे,- वय २०रा.त्र्यंबकेश्वर नाशिक, गौतम आनंदा मोरे वय-२४रा. भांडुप हे इसम भांडुप, त्र्यंबकेश्र्वर नाशिक येथुन गुढे ता.भडगांव येथे पायी चालत येवुन कोणास काही एक न सांगता गावात राहत असल्याबाबत कळविले असता सदर इसमास कॉरंनटाईन करून फिर्यादी-पो.कॉ.एकनाथ धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्याने नितिन भगवान मोरे वय-२८रा.भांडुप,सुनिल वसंत मोरे,- वय २०रा.त्र्यंबकेश्वर नाशिक, गौतम आनंदा मोरे वय-२४रा. भांडुप यांच्या विरुद्ध मा. जिल्हाधिकारी सो.जळगांव यांचे आदेशाचे उल्लघंन केले असल्याने त्यांच्याविरुद्ध १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नितिन सोनवणे हे करीत आहे.