<
डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात ११ गावामध्ये गावात 2500 मास्क वाटप . 10979 नागरिकापर्यत उपक्रमामार्फत वैद्यकीय सेवाकार्य पोहचले
जामनेर-(अभिमान झाल्टे) – कोरोनारूपी जागतिक संकटाला रोखण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर व आमदार गिरिषभाऊ महाजन फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे .
ग्रामीण भागातील गावात जाऊन डॉक्टर विनामूल्य वैद्यकीय सेवा देत असुन सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -19 बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे .
अभाविप व जी.एम.फाउंडेशन वतीने मोफत मास्क वाटप करून मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर व आमदार गिरिषभाऊ महाजन फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात करण्यात येत आहे .
डॉक्टर आपल्या दारी या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव जनता बँक अध्यक्ष अनिल राव सर यांच्या मार्फ़त 5 PPE किट ग्रामीण भागात वैद्यकीयसेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी उपलब्ध केले असुन आमदार गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्फत मास्क पुरवठा उपलब्ध झाला आहे. डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात भराडी , भिलखेड़ा , सवतखेड़ा ,रोटवद , जलांद्री , सावरला , आमखेड़ा देवी , शंकरपुरा , नागन खुर्द , वाडी किल्ला वस्ति , शहापुर या ११ गावामध्ये गावात 2500 मास्क वाटप करण्यात आले .
10979 नागरिकापर्यत उपक्रमामार्फत वैद्यकीय सेवाकार्य पोहचले .पुणे , मुंबई ,सूरत येथून आलेल्या नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली व औषधी उपलब्ध देखील देण्यात आले.
डॉक्टर आपल्यादारी या अभिनव समाज उपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.
कोविड 19 च्या जागतिक संकटाला मात देण्यासाठी अभाविप व जि.एम फाउंडेशन च्या माध्यमातून डॉक्टर आपल्यादारी उपक्रमातुन ग्रामीण भागात जनजागृती करू वैद्यकीय सेवा कार्य राबवित आहे .
माजी मंत्री आमदार गिरिष महाजन
ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीपोटी वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने कोविड -19 बाबत जनजागृती व वैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाभावी वृतीतून अभाविप व जी.एम. फाउंडेशन माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे.