<
जळगांव(चेतन निंबोळकर)- देश और समाज हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे..! हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन सदगुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष प.पु.नंदू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाने तसेच सदगुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप चौधरी तसेच संचालिका भारतीताई संदीप चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील गरजू कुटुंबाना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रोजगार मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारसहन करावी लागत आहे. अशा गरजू कुटूंबांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सुमारे १०० परिवारांना लॉकडाउन संपेपर्यंत पुरेल एवढे किराणा मालाचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसाराची चाके थांबली आहेत. यात निराधार व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून समाजातील अनेक सेवाभावी संस्था तसेच नागरिक आपापल्या परीने सहकार्य करीत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी सदगुरु सेवा मंडळाचे सचिव जगदीश तळेले, ऊपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, जयंत पळशीकर, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.