<
एरंडोल(प्रतिनिधी) – येथील सुशिक्षित बेरोजगार तरूणाने एक व्यापारी संकुल निर्माण करून स्वत: तसेच इतर बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा व प्रगती कडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असताना एरंडोल नगर परीषदेचे मुख्याधिकारी श्री. कीरण देशमुख ,अभियंता देवेंद्र शिंदे तसेच कॉनट्रँक्टर आनंद दाभाडे या व्यक्तींकडून आपला मानसिक छळ करण्यात येत असल्याने ईच्छामरणाची राष्ट्रपतींकडे परवानगी मागीतली आहे,राहूल पाटील यांनी आँनलाईन रीत्या काही दिवसांपूर्वी एरंडोल नगरपरीषदेच्या भोंगळ व नितीभ्रष्टतेबाबत तसेच लाचखाऊ पणा विषयी मा. मुख्यमंञी श्री.फडणविस हे जळगाव दौर्यावर आले असता त्यांना ट्विटर द्वारे कळविण्यात आले होते, हे समजताच तात्काळ रातोरात मिटींग घेऊन नगरपरीषदेने आपल्यावर सूडात्मक बुध्दीने एरंडोल पोलिस स्टेशन ला एफ आय आर दाखल केला आहे असे राहुल पाटिल यांनी सांगीतले व नंतर त्यांनी इच्छामरणाची मागणी केलीय आणि ती ही स्वातंञ्य दिनी केलीय, राहूल पाटील यांनी ऑनलाइन द्वारे राष्ट्रपतींकडे १ऑगस्ट रोजी निवेदन पाठवले आहे व निवेदनात सदर व्यक्तिंच्या लाचखाऊपणास कंटाळून इच्छामरणाची परवानगी मागीतली आहे .पदाचा गैरवापर करून मला आरोपी करण्याचे षडयंञ रचण्यात आल्याची तक्रार राहुल पाटिल यांनी केली आहे .