Tuesday, March 2, 2021
सत्यमेव जयते
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • माहितीचा अधिकार २००५
  • लैंगिक शिक्षण
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • माहितीचा अधिकार २००५
  • लैंगिक शिक्षण
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1min read
कोरोना विषाणुच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रालयातील पथकाने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश

पुणे, दि.20 – वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक आज पुण्यात आली. या चमूने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.
या चमूतील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशिष गवई, आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.
बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय पथकाने जाणून घेतली.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे. एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये 55 ते 70 वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांशी लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरूवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. जिल्हा, मनपा, आरोग्य व पोलीस प्रशासन हे संयुक्तपणे हातात हात घालून काम करीत आहे, असे ते म्हणाले.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. काही दिवसांत परिस्थिती निश्चित नियंत्रणात येईल, असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपपक्रमांबद्दलही सांगितले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आमच्या भागात उद्योग व आय.टी.कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व अपर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून काही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. भविष्यात  कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. परिस्थिती आव्हानात्मक असली तरी आपण त्याला निश्चितपणे तोंड देऊ, असे स्पष्ट करुन मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आम्ही सुरूवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. आमच्या भागात बाधितरुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आम्ही गाफील नाही. सातत्याने उपाययोजना व जनजागृती करीत आहोत. शिवाय खाजगी रुग्णालयांबरोबरही समन्वय साधून त्यांच्याशी करार केलेला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गत अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरू केले. आरोग्याबरोबरच अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण भागाची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
शेवटी केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा म्हणाले, सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्न–धान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी सूचना केली
.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत “तांदूळ” वाटप

Next Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात तांदूळ वाटप

Next Post
शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात तांदूळ वाटप

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात तांदूळ वाटप

जाहिरात

जाहिरात

फेसबुक पेज ला लाईक करा

फेसबुक पेज ला लाईक करा

ताज्या बातम्या

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आरोग्य तपासणी मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आरोग्य तपासणी मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न

पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न

बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

महावितरण कंपनीत निवड झालेल्या EWS च्या २३६ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महावितरण कंपनीत निवड झालेल्या EWS च्या २३६ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी 14 अर्ज दाखल

गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

राजणी येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

राजणी येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून “हायवे मृत्यूंजय दूत” योजनेला सुरवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

FOLLOW

जाहिरात

जाहिरात

कोरोना संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2020/12/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • माहितीचा अधिकार २००५
  • लैंगिक शिक्षण
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.

%d bloggers like this: