Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिटे वे’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नाशिक ठरतेय कोरोनाचे ‘एक्झिटे वे’

जिल्ह्यातील दुसरा तर महानगर पालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक, दि. २०: जिल्ह्यातील दुसऱ्या तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या रुग्णाच्या दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याला दीर्घ आरोग्यासाठी शुभेच्छा देवून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले, हे आरोग्य यंत्रणेचे यश पाहता प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त होवून नाशिक कोरोनाचे ‘एक्झिट वे’ ठरेल, असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केला.
गोविंद नगर येथील हा रुग्ण दिल्ली येथे जावून आला असल्याने ४ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्त्रावाची चाचणी केल्यानंतर ६ एप्रिल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा महानगर पालिकाक्षेत्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करुन त्याला कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झाले असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी खूप परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, नाशिक शहरासह मालेगाव येथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रुग्णही या रुग्णाप्रमाणेच लवकर बरे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये गेला असल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून कुठल्याही व्यक्तीला रुग्णालयात येण्याची वेळ येवू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहनही डॉ. जगदाळे यांनी यावेळी केले.

माझ्या आनंदाचे श्रेय आरोग्य यंत्रणेला:

कोरोना आढळून आला तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. परंतु येथील आरोग्य यंत्रणेने माझ्या आजारावर उपचार करण्याबरोबर मला मानसिकरित्या देखील सक्षम केले. त्यामुळेचं मी आज कोरोनासारखे युध्द जिंकू शकलो आहे. त्यामुळे आजच्या माझ्या आनंदाचे श्रेय हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला आहे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी डॉक्टरांना व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही कोरोनामुक्त रुग्णाने यावेळी नागरिकांना केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात तांदूळ वाटप

Next Post

लॉकडाऊन काळात घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याने नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द

Next Post

लॉकडाऊन काळात घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याने नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo