<
रावेर – (प्रतिनिधी) – युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र जळगाव व नेहरू युवा केंद्र सलग्नित भिमालय फाऊंडेशन रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर येथे माक्स चे वाटप करण्यात आले.
देशात कोरोना विषाणू ने थैमान घातले असून प्रशासन कोरोना विषाणूचा प्रभाव संपवण्यासाठी सर्वपरी प्रयत्न करत आहे. त्यातच शासकीय संघटन व सामजिक संस्थाही त्याच्या परीने प्रयत्न करीत आहे. नेहरू युवा केंद्र जळगाव व नेहरू युवा केंद्राशी संलग्नित भिमालाय फाऊंडेशन यांच्या वतीने माक्स चे वाटप रावेर येथे करण्यात आले. विशेष म्हणजे हे माक्स शेतीशी निगडित काम करणारे मजूर वर्ग व माथाळी कामगार यांच्यात वाटप करण्यात आले. वाटप करते वेळी सदर लोकांना घरात रहा सुरक्षित रहा. माक्सचा वापर करा. सामजिक अंतर पाळा अश्या सूचना देखील देण्यात आल्या. सदर माक्स चे वाटप नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्रजी व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली भिमालयं फाऊंडेशन चे अध्यक्ष मेघराज शेगावकर व सचिव पंकज वाघ व नेहरू युवा केंद्राचे रावेर तालुका समन्वयक प्रेरणा गजरे व शिवदास कोचुरे यांनी केले.