<
जळगाव –(प्रतिनिधी) – कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीचे काळात मानसशास्त्र तज्ज्ञांनी समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहेसद्यस्थितीशी जुळवुन घेतांना ज्यांना अवघड जाऊन निद्रानाश, चिडचिड, बेचैनी,चिंता, नैराश्य किंवा मानसिक दौर्बल्य जाणविते आहे, अश्या व्यक्तिंसाठी विनामूल्य टेली काऊन्सलिंग सेवा उपलब्ध केली आहेरेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखा आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लॉक डाऊन च्या काळात पहिल्यांदा समुपदेशनाची सेवा देणारा हा उपक्रम होय.समुपदेशक टेली काऊन्सलिंग द्वारे मार्गदर्शन करीत आहेकोणत्याही अबाल वृद्धास निद्रानाश, चिडचिड, बेचैनी, चिंता किंवा मानसिक दौर्बल्य, नैराश्य जाणवत असेल त्यांनी खास हेल्प लाईन वर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत केव्हाही हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. समुपदेशना सठी 9403382550,7888215231हे दोन विशेष नंबर्स हेल्पलाईन साठी असुन गरजवंत कोणीही निसंकोच संपर्क करावा. समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील.या बहुउपयोगी कार्यासाठी विणा महाजन, आनंदराव जाधव, मृदुला कुलकर्णी, ऍड. अनुराधा वाणी, पियाली पुरोहित, लीना जैन, ऋषीकेश शिंपी, वृषाली व्यवहारे, संगीता संघवी, किशोर राजे, शरद अकोले, सुधीर वाघुळदे, विवेक कुलकर्णी, शुभांगी मोहरीर, प्रो.एस पी भावसार, शैलजा पप्पु, चंचल रत्नपारखी, निलिमा मेंडकी, जयश्री देवरे, डाॅ. बालाजी राऊत, डाॅ.प्रतिभा हरणखेडकर, डाॅ. राणी त्रिपाठी, डॉ. अपर्णा मकासरे, धनंजय जकातदार, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनीहे सर्व समुपदेशक मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहणार आहे.सर्व समाजाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इंडियन रेडक्राॅस सोसायटी जळगाव शाखा आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स असोसिएशन जळगाव च्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकान्वये देण्यात आली.हा उपक्रम राबविण्यासाठी रेडक्रॉस चे आणि सायकॉलॉजी कोन्सिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहे.