<
जळगाव, दि. 21 (जिमाका) – सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी (त्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी) कार्यरत असल्यास अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादि कार्यरत मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती (दरवर्षी दर तिमाहीस) माहे जानेवारी ते मार्चची माहिती 30 एप्रिलपर्यत, माहे एप्रिल ते जूनची त्रैमासिक माहिती 31 जुलैपर्यंत, माहे जुलै ते सप्टेंबरची त्रैमासिक माहिती 31 ऑक्टोंबरपर्यत आणि माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर या त्रैमासिकाची माहिती 31 जानेवारीपर्यंत कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक आहे.
माहे जानेवारी ते मार्च या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्तेवर क्लिक करून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने 30 एप्रिलपर्यंत भरावयाची अंतिम मुदत आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा. आणि रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा कायदा 1959, नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव श्रीमती अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.