<
जळगाव – (जिमाका) – येथील कोविड रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या कोरोणा संशयित रुग्णांपैकी दोन रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे
या कोरोना बाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा कालच रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता आता अधिक जबाबदारीने लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. व घरातच रहावे कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
जिल्हावासियांनी स्वतः ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. मीच माझा रक्षक ही भूमिका अंगी बाळगून घरातच रहावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.