<
जळगांव,(प्रतिनिधी) – तालुक्यातील आसोदा येथील जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी धाड टाकत जुगाऱ्यांवर कारवाई केली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत आसोदा येथील रहिवाशी असलेल्या १३ आरोपीविरुद्ध जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १५ दुचाकी व ३ हजार ४५० रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ३७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पो. स्टेशन चे पो.नि रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सुधाकर शिंदे हे करीत आहेत.