<
पंढरपूर -(प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील जनता ज्यावेळी अपेक्षेने सरकारी रुग्णालयात येत असतांना केवळ आपली जबाबदारी झटकण्याचे हेतूने रुग्णाचा जीव धोक्यात घालणाऱ्या डॉ घोडके यांच्यावर कारवाई ची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी प्रांताधिकारी व आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांच्याकडे केली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट अतिशय त्रिव असतांना सोलापूर शहर पूर्ण सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनास घ्यावा लागत आहे, असे असतांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती अथवा इतर आजरांमुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सबळ कारण नसतांना व पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असतानांही सोलापूर येथे रुग्णाला पाठविण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सौ शशिकला सतीश जाधव (वय 22) या महिलेस प्रसूती वेदना होत असल्याने दाखल करण्यात आले होते या ठिकाणी प्रसूती होणार नाही, सदर महिलेस रक्त कमी आह. तिला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ साधनाताई राऊत यांच्याशी त्या महिलेच्या पतीने संपर्क केल्यानंतर सौ राऊत यांनी राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आरोग्यमंत्री ना. राजेश भैया टोपे यांच्याशी संपर्क केल्यानंतर घटनास्थळी जाऊन कॉल करण्याच्या सूचना दिल्या पण श्रीकांत शिंदे हे कॉटेज हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आत डॉ घोडके यांनी त्या महिलेला सोलापूर ला पाठवले होते.
ज्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी ढवळे मॅडम यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी सांगितले की महिलांची परिस्थिती खूप चिंताजनक आहेे.
मग श्रीकांत शिंदे यांनी असा सवाल केला की ज्या महिलेला रक्त नाही, एच बी कमी आहे म्हणून पंढरपूर हॉस्पिटलमध्ये प्रस्तूती होऊ शकत नाही मग सोलापूर हॉस्पिटलमध्ये कशी होऊ शकते? हे केवळ जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत व एकमेकांना लपवण्याचा प्रकार आहे असे देखील यावेळी श्रीकांत शिदे याांनी म्हटले आहे.
वास्तविक पाहता पंढरपूर शहरात पुरेसा रक्ताचा साठा उपलब्ध असतांना व सुविधा उपलब्ध असतानांही केवळ जबाबदारी झटकण्याचे हेतूने सदर महिलेस सोलापूर येथे पाठविण्यात आले. हा प्रकार गंभीर आहे, जर जातांना त्या महिलेचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होते. असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे व कामचुकार पणे वागणाऱ्या डॉ घोडके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन देऊन दाखल केली आहे. तसेच याबाबत आरोग्यमंत्री यांच्याशी ही बोलणे झाले असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.