Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फरसाण, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी रद्द-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 – लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठ्यात यापूर्वी स्नॅक्स (फरसाण), कन्फेक्शनरीज, मिठाईची दुकाने सुरु ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. पंरतु आता वगळण्यात आलेल्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आली असून आता या बाबींना देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.


सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.
यामध्ये व्यावसायीक व खाजगी आस्थापना सुरु ठेवण्याबाबत ई कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तु, अन्न, औषधे व औषध उत्पादनाशी संबंधित घटक आणि वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची मुभा असेल. तथापि ई कॉमर्स कंपन्यांच्या वाहनांना संबंधित कार्यक्षेत्रातील (उपविभागीय अधिकारी/तहसीलदार) यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
तसेच प्रिंट मिडियाला दि. 20 एप्रिल, 2020 पासून सुट देण्यात आलेली आहे. तसेच वर्तमानपत्रे, मासिके यांचे घरपोच वितरण करता येईल. तथापि वर्तमानपत्रे, मासिके विक्रेता व घरपोच सेवा घेणारे ग्राहक व सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, हॅण्ड सॅनिटाईजर वापरणे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक राहील. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गरजूंच्या मदतीसाठी सरसावले भाजपा जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ जावळे

Next Post

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

Next Post
कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

Comments 2

  1. Sonal shubhas Gosavi says:
    6 years ago

    Best

    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      6 years ago

      धन्यवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo