मुंबई-(सुशीलकुमार सावळे) – आज भारतासह संपूर्ण जग ह्या कोरोना विषाणूंसोबत लढा देत आहे. केंद्र सरकार तसेच राज्यसरकार सुद्धा आपापल्या परीने उत्तम कामगिरी बजावत आहेत. देशामध्ये विविध ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या हि वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये हि संख्या लक्षणीय आहे. मुंबई मध्ये सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हि झपाट्याने वाढत आहे. मुंबई मध्ये बहुतांश भाग हा दाट लोकवस्तीचा आहे. अशा भागांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे शक्य होत आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार हा झपाट्याने होत आहे. भांडुप सुद्धा असाच काहीसा झोपड्पट्टीबहुल भाग आहे. अतिशय घनदाट लोकवस्ती व झोपडपट्टी त्यामुळे अशा विभागामध्ये जास्तीत जास्त खबरदारी घेणे हे गरजेचे आहे.
भांडुप पश्चिम विधानसभा आमदार श्री रमेश कोरगावकर यांच्या माध्यमातून व सायन हॉस्पिटल, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या साहाय्याने भांडुपमध्ये गणेश नगर, टेम्बीपाडा, बुद्ध नगर अशा विविध ठिकाणी कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांची तपासणी व्हावी व निदान झालेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार करता यावेत यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य शिबिरास भेट देऊन तपासणी करून घ्यावी तसेच नागरिकांनी घरातच बसून काळजी घेण्याचे आवाहन आमदार रमेश कोरगावकर यांनी सत्यमेव जयतेच्या माध्यमातून केले आहे.