जळगाव – (जिमाका) – दिनांक 20 व 21 एप्रिल रोजी कोविड19 रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी 16 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.