देशाची एकता व अखंडता अबाधित राहण्यासाठी उद्याचा पांढरा इशारा व परवाचा काळा दिवस मागे घेत आहोत -IMA जळगांव सचिव डॉ. स्नेहल फेगडे
जळगांव(प्रतिनिधी)- डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. डॉक्टरांवरच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढणार असून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन मिळणार नाही. तसेच तीन महिने ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली आहे. सतत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्लाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उद्या गुरुवारी आंदोलन करणार होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे IMA सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी कळविले आहे.