जळगांव(चेतन निंबोळकर)- शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत खारीचा वाटा म्हणून पोलिस बिनतारी संदेश विभागाचे नाशिक परिक्षेत्र पोलिस उपअधिक्षक गजानन शेलार यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार पोलिस बिनतारी संदेश विभाग जळगाव व कृती फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रत्येक शाखा तसेच पोलिस मोटर परीवहन विभाग पोलिस मुख्यालय येथे एकूण ३०० मास्क वाटप करण्यात आले.
सदगुरू सेवा मंडळ व कृती फाऊंडेशनच्या वतीने संदिप चौधरी, भारती चौधरी, कपिल महाजन यांनी हे मास्क उपलब्ध करून दिले. जवळपास दोन महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना या विषाणूने मुळे निर्माण झालेल्या परिस्थितिची जाणिव ठेऊन पोलिस बिनतारी संदेश विभागा तर्फे शहरातील ३० गरजु व निराधार कुटूंबांना किराणा तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम जळगांव पोलिस बिनतारी संदेश विभागाचे पोलिस निरिक्षक सुनील बोंदर, पोनि MTO पंकज पवार, पो.उप.नि.अनिल गोरे, पोउनि आय.आय. तडवी यांच्या मार्गदर्शनाने तसेच जळगांव पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. “हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि मीच माझा रक्षक” असे संदेश यावेळी देण्यात आला. आपण झिजोनी अंगे स्वतः, सुखी करावी जनता या उक्ती प्रमाणे समाजासाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न केला असून, यातून आत्मिक समाधान मिळालं याच आनंद आहे. असे पो निरिक्षक सुनील बोंदर यांनी भावना व्यक्त केली. प्रसंगी, स.फौज. दिपक पुजारी, गोविंद खैरनार, संजय मराठे, व्ही. बी. संन्याल, संजय महाजन, जाचक सर, वा.ऑ. विजय बुंदेले, सागर पाटील, सलीम तडवी, सुनील पवार, गजानन राठोड, शिवाजी पाटील, इसाक तडवी, अमित गवलकर, अजिंक्य साळवे, पो.कॉ. अलीम शेख, अनिल उके, निलेश चव्हाण, प्रवीण भिसे, श्री. दुसाने आदी उपस्थित होते. या उपक्रमास कृती फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष कपिल महाजन, डॉ श्रेयस महाजन, भारती चौधरी, गिरिश अपस्तंब, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे दिपक पुजारी, गोविंद खैरनार, ईसाक तडवी, संजय वारूलकर यांचे विषेश सहकार्य लाभले. सेवे बरोबर सामाजिक बांधिलकी जपनाऱ्या पोलिस बिनतारी संदेश विभाग, कृती फाऊंडेशनचे तसेच सदगुरु सेवा मंडळाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.