धुळे-(जिमाका) – जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे आणखी सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा धुळे शहरातील, तर एक शिरपूर येथील असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यांच्यावर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरीच थांबावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.