नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक श्री. नरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १५ तालुक्यात एकूण ३१ स्वयंसेवक कार्यरत
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे जीवन खडतर झालंय, तसेच शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णामध्ये वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णांमुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्राच्या वतीने नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा समन्वयक श्री. नरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १५ तालुक्यात नेहरू युवा केंद्राचे एकूण ३१ स्वयंसेवक कार्यरत आहेत व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतांना दिसून येत आहेत.
जसे की, आयगोट ट्रेनिंग अँप-२७०, आरोग्य सेतू अँप -७५०, रक्तदाता नोंदणी -१६९, स्वयंसेवक नोंदणी-१०९ तसेच आतापर्यंत एकुण १००० हजाराच्या वर मास्क नेहरू युवा केंद्राच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत. तर विविध २५०० च्या जवळपास लोकांना मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यात गरजुंना जेवण, मास्क वाटप, समुपदेशन असे विविध प्रकारची समाजहिताचे काम त्यांच्यावतीने सुरू आहेत.