तालुकानिहाय संरक्षण अधिकारी, समुपदेशकांची नियुक्ती
जळगाव. दि. 23 (जिमाका) – कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी शासकीय तसेच विविध स्वयंसेवी संस्था अहोरात्र काम करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनकडून घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार बुडत आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढू शकतो. याचे परिणाम प्रामुख्याने महिलांना मोठ्या प्रमाणात जाणवतात. महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांना संरक्षण तसेच त्यांना कायदेतज्ज्ञांकून कायदेशीर मार्गदर्शन, मानसोपचाऱ्यांकडून त्यांचे समुपदेशन, वैद्यकीय तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला, आदि नामांकित संस्था आपआपल्या पध्दतीने समाजातील पिडीत व्यक्तिंना ऑनलाईन मार्गदर्शन, मदत आदि सुविधा पुरवित आहेत. विविध नामांकित संस्थांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच 100 व 108 हे हेल्पलाईन क्रमांकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचार पिडीत महिलांसाठी आशादिप महिला वसतिगृह, प्लॉट नं.6, विजय कॉलनी गणेश कॉलनी, जळगाव येथे 24 तास वनस्टॉप सेंटर कार्यरत आहे. यामध्ये एका छताखाली पिडीत अत्याचारीत महिलांना मदत मिळावी यासाठी महिलांना कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आरोग्यविषयक मदत, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था, समुपदेशन, पोलीस यंत्रणेशी समन्वय, कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जात आहेत.
कौटुंबिक हिंसाचारातंर्गत पिडीत महिलांच्या मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा विधीसेवा समिती यांचे अधिपत्याखालील संरक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केलेले संरक्षण अधिकारी त्यांचे कार्यक्षेत्र व भ्रमणध्वनी क्रमांक याप्रमाणे.
श्रीमती. आरती साळूंखे, जळगव जिल्हा -9403479788, श्री. महेंद्र बेलदार,जळगाव ग्रामीण-8693875656, श्रीमती. रिटा भंगाळे, चोपडा ग्रामिण-9970457432, श्री. विशाल ठोसरे, जामनेर ग्रामिण-8805123302, श्री. आशिष पवार, पाचोरा ग्रामीण-7875202581, श्री. मिलींद जगताप, रावेर ग्रामीण- 9822218651, सौ. योगीता चौधरी, अमळनेर-9860036634, श्री. प्रतिक पाटील, बोदवड-9881169333, श्री. च्रद्रशेखर सपकाळे, धरणगाव ग्रामीण-9890091943, प्रतिक पाटील, भुसावळ ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार)-9881169333, श्री. सुदर्शन पाटील, भडगाव ग्रामिण-7588646690, श्री. प्रशांत तायडे, मुक्ताईनगर ग्रामीण-9421708292, सौ. उर्मिला बच्छाव, एरंडोल ग्रामीण-869387755656, श्री. राजू बागुल, पारोळा ग्रामिण-9011361853, श्री. मिलींद जगताप, यावल ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार) 9822218651, श्री. सुदर्शन पाटील, चाळीसगाव ग्रामीण (अतिरिक्त कार्यभार)-7588646690 याप्रमाणे संरक्षण अधिकऱ्यांची नेमणूक केलेले आहेत.
तसेच विधी व सेवा प्राधिकरण यांच्यावतीने विधी सल्लागार/विधी तज्ज्ञ यांचीही नेमणूक केलेली आहे. ॲड. श्रीमती. संध्या वानखेडे-9730435641, ॲङ श्रीमती. मंजुळा मुंदळा-9823633636, ॲङ श्रीमती. भोकरीकर-9326653706, ॲङ श्रीमती. काबरा-9823621307 याप्रमाणे आहेत.
समुपदेशन केंद्रातील समुपदेशक, त्यांचे कार्यक्षेत्र व भ्रमणध्वनी श्रीमती. शोभा हंडोरे, जळगाव -7757074197, श्रीमती. विद्या सोनार, जळगाव-9371793635, श्रीमती. रेणू नरेंद्र प्रसाद, अमळनेर-9422336249, श्रीमती. मिनल शि.पाटील, अमळनेर-9850770181, श्रीमती.भारती केशव म्हस्के, भुसावळ-7709997975, श्रीमती. शितल आव्हाड, भुसावळ-9890517451, श्री. विठ्ठल शिवाजी पाटील, चाळीसगाव-7588007407, श्रीमती. पुनम हि. जगदाळे, चाळीसगाव-8657282800 याप्रकारे आहेत.
वन स्पॉट सेंटरसाठी नियुक्त अधिकारी आणि त्यांचे भ्रमणध्वनी श्रीमती.आरती साळुंके, केंद्र प्रशासक-9403479788, श्रीमती संध्या वानखेडे, विधी सल्लागार-9730435641, श्रीमती. निता कायटे, पोलीस अधिकारी-9421429428, श्रीमती. विद्या सोनार, समुपदेशक-9371793635
याप्रमाणे नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. कौटुंबिक हिेसाचारातील पिडीत महिलांनी यांच्याशी संपर्क साधून आपल्याला न्याय मिळवून घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजजा, जळगाव यांच्या 0257-2228828 या कार्यालयीन दुरध्वनीवर क्रमाकांवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.